Ladaki Bahin Yojana January 2026 Update: महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी जानेवारी २०२६ च्या हप्त्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकांमुळे या हप्त्याच्या वितरणात जो बदल करण्यात आला होता, तो आता पूर्ण झाला असून हप्ते जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारी २०२६ चा हप्ता १७ जानेवारी २०२६ पासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे.
विलंब का झाला होता? सुरुवातीला सरकार डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्यांचे मिळून ₹३००० मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर (१४ जानेवारी) देणार होते. मात्र, १५ जानेवारीला होणाऱ्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे आणि आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने ‘अग्रिम’ (Advance) हप्ता देण्यास मनाई केली होती.
जर तुमचा हप्ता अद्याप आला नसेल, तर खालील गोष्टी तपासून पहा:
१. अधिकृत संकेतस्थळावर (ladakibahin.maharashtra.gov.in) जा. २. मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून Login करा. ३. ‘Application Made Earlier’ या पर्यायावर क्लिक करा. ४. तिथे तुम्हाला स्टेटस ‘Approved’ दिसत असल्यास पैसे नक्की येतील.
विशेष टीप: ज्या महिलांना तांत्रिक कारणांमुळे डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांना जानेवारीच्या हप्त्यासोबत एकत्रित ₹३००० मिळण्याची शक्यता आहे. नियमित लाभार्थ्यांना ₹१५०० मिळतील.
तुमचे e-KYC अद्याप अपूर्ण असल्यास ते त्वरित पोर्टलवर जाऊन पूर्ण करा. तसेच, तुमची बँक स्थिती तपासण्यासाठी बँकेत जाऊन ‘आधार मॅपिंग’ झाले आहे की नाही याची खात्री करा, जेणेकरून पुढील लाभ थांबणार नाही.